राजकीय पक्षातील नेत्यांना शेंदुर्णी गावात प्रवेश बंदी

शेंदुर्णी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  सकल मराठा समाजाचे वतीने सर्वपक्षीय नेते, आमदार, खासदार,मंत्री यांना शेंदुर्णी शहरात प्रवेश बंदी करण्यात आली असून तसे बॅनर शेंदुर्णी शहराचे सोयगाव, पहूर,पाचोरा रस्त्यावरील प्रवेश द्वारावर लावण्यात आली आहेत.

शेंदुर्णी शहरातील सकल मराठा समाजाचे वतीने गुरूवारी २ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता सर्व राजकीय पक्षाचे नेते, आमदार, खासदार,मंत्री यांना शहरात प्रवेश बंदी करण्यात आली. त्यावेळी उपस्थित शेंदुर्णी सकल मराठा समाज बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा समाज आरक्षणास पूर्ण पाठिंबा दर्शविण्यासाठी राजकीय प्रवेश बंदी बॅनर लावण्यात आले. यावेळी मराठा समाजास त्वरित आरक्षण देण्याची मागणी राज्य सरकारला करण्यात आली.

Protected Content