साकरे विद्यालयात इंद्रधनु सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील साकरे येथील बा.च. भाटिया माध्यमिक विद्यालयात नुकतेच ‘इंद्रधनु’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते. या कार्यक्रमाला धरणगाव नगरपालिकेचे नगरसेवक कैलास माळी सर अध्यक्ष म्हणून लाभले. तर जिल्हा परिषद सदस्या माधुरीताई अत्तरदे उद्घाटक म्हणून उपस्थित होत्या.

३१ जानेवारी रोजी झालेल्या या कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे बालसाहित्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका पाटील मॅडम यांनी केले. कार्यक्रमाला साकरे, निमझरी व कंडारी या तिन्ही गावांचे सरपंच, उपसरपंच तसेच कंडारी येथील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन भिकादादा पटेल, माजी जि.प. सदस्या वैशाली पाटील, धरणगाव नगरपालिकेच्या माजी उपनगराध्यक्षा नूतनताई पाटील, एरंडोल येथील अंजुषा चव्हाण, मंगल भाटिया, शेखर पाटील, विद्यालयाचे सर्व संचालक, गावातील विविध पदाधिकारी व तिन्ही गावातील पालक वर्ग, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आवर्जून उपस्थित होते. इयत्ता पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेऊन विविध नाटिका, नृत्य, हास्यविनोद, एकांकिका सादर केल्या. इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी मुस्कान शहा, नाजिया शहा तसेच श्रीमती शिंदे मॅडम, राजेश्वर न्हायदे, एम.डी. गुजर, एल.पी. माळी यांनी कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या शेवटी सांस्कृतिक समिती प्रमुख श्री एल पी माळी सर यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी परिश्रम घेतले.

Add Comment

Protected Content