कार्यकाळ संपला म्हणजे संपला – गांगुली

Ganguly

 

मुंबई वृत्तसंस्था । कार्यकाळ संपला म्हणजे संपला. एम.एस.के. प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीला मुदतवाढ मिळणार नसल्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी म्हटले आहे. बीसीसीआयच्या मुंबईतील वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर गांगुली यांनी पत्रकार परिषदेत हे स्पष्ट केले. त्यामुळे आगामी काळात एम.एस.के. प्रसाद यांची जागा कोण घेणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

एम.एस.के. प्रसाद तुमच्या कार्यकाळानंतर तुम्हाला मुदतवाढ मिळणार नाही, असे गांगुलीने पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. बीसीसीआयच्या संविधानानुसार, निवड समिती सदस्यांचा कार्यकाळ हा चार वर्षांचा असतो. प्रसाद आणि त्यांचे सहकारी गगन खोडा हे २०१५ साली निवड समितीचे काम पाहत होते, तर जतीन परांजपे, शरणदीप सिंह आणि देवांग गांधी यांनी २०१६ साली निवड समितीत सहभागी झाले. त्यामुळे नियमानुसार प्रसाद आणि खोडा यांचा कार्यकाळ संपलेला आहे. कार्यकाळ संपला म्हणजे कार्यकाळ संपला. त्यांनी आतापर्यंत चांगले काम केले आहे. तुम्हाला तुमच्या ठरवून देण्यात आलेल्या कार्यकाळापेक्षा जास्त काम करता येत नाही. समितीतल्या सर्वांचा कार्यकाळ संपत नसल्यामुळे काही लोकं या समितीत कायम राहतील. बीसीसीआय अध्यक्ष या नात्याने गांगुली यांनी आपली बाजू मांडली. त्यामुळे आगामी काळात एम.एस.के. प्रसाद यांची जागा कोण घेणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Protected Content