नौशेरा सेक्टरमध्ये दशतवाद्यांसोबत चकमक ; दोन जवान शहीद

1551586524 jammuandkashmir AP

श्रीनगर (प्रतिनिधी) जम्मू-काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये जवानांकडून दहशवाद्यांना शोधण्याची मोहीम राबवली जात असताना, दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन जवान शहीद झाले आहेत. चकमकीनंतर देखील परिसरात शोधमोहीम सुरूच आहे.

 

काही दिवसांपूर्वी, पाकिस्तानी सैन्याकडून सीमारेषेलगत असणाऱ्या उरी सेक्टरमध्ये बेछूट गोळीबार करण्यात आला होता. यात भारतीय सैन्यदलाच्या एका अधिकाऱ्याचा आणि एका स्थानिक महिलेचा मृत्यू झाला होता. बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. येथील हाजीपीर परिसरात पाकिस्तानी सैन्याकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. यानंतर भारतीय सैन्याकडूनही या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आले होते.

Protected Content