अमळनेर (प्रतिनिधी) लोकमान्य टिळक स्मारक समितीच्या शतक महोत्सवानिमित्त भारत स्वाभिमान केंद्र , पतंजली योग केंद्र अमळनेर व लोकमान्य टिळक स्मारक समितीतर्फे दिनांक – ६ एप्रिल ते १९ एप्रिलच्या दरम्यान,अमळनेर येथे योग प्रशिक्षण वर्ग व योग स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली.
दिनांक ६ एप्रिल ते १९ एप्रिल पर्यंत दररोज सकाळी ५:३० ते ७:३० या वेळेत बजरंग पॅलेस, प्रताप मिल, अमळनेर येथे झाले. या प्रशिक्षण वर्गास पूज्य शांतीदास महाराज ,कामलेशजी आर्य, गजानन माळी, प्रा. धनंजय चौधरी सर यांनी १४ दिवस योग विषयी मार्गदर्शन केले. तसेच योगाचे अनेक फायदे त्यांनी सांगितले. योग मार्गदर्शनासाठी त्यांचा समितीमार्फत सत्कार करण्यात आला. योग शिबिरात ५०ते ६० स्री- पुरुषांनी सहभाग नोंदवला होता. सदर योग प्रशिक्षण वर्ग यशस्वी करण्यासाठी लोकमान्य टिळक स्मारक समिती ट्रस्टचे अध्यक्ष श्री बजरंगलाल अग्रवाल, चिटणीस श्री प्र.ज.जोशी सर , सदस्य श्री राजेंद्र खाडिलकर सर, श्री आत्माराम चौधरी सर, श्री लोटन पाटील, सहाय्यक श्री जगतराव निकुंभ सर यांनी अनमोल असे सहकार्य केले.