यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील जिल्हा एकात्मिक विकास प्रकल्प कार्यालयातील रोजंदारीवरील कर्मचार्यांनी वरिष्ठ अधिकार्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आपले उपोषण मागे घेतले.
येथील जिल्हा एकात्मिक विकास प्रकल्प कार्यालया , समोर सन२०२३-२४या शैक्षणीक वर्षात सर्व वर्ग-३/४ रोजंदारी /तासिका तत्वावरील कर्मचार्यांना आश्रमशाळा / वस्तीगृहावर तात्काळ हजर करून शासनाचे आदेश निर्गमित करण्या संदर्भातील मागण्यांना घेवुन आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते. हे उपोषण प्रकल्प अधिकारी यांच्या लिखित आश्वासनाने सोडविण्यात आले.
या मागण्या संदर्भात कृती समितीच्या वतीने न्यायालयात रिट याचिका दाखल केली असुन, आदीवासी विभागाने अशा कर्मचार्यांना कामावरून कमी करू नये,असे उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये राज्यातील रोजंदारी कर्मचार्यांच्या सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहे. असे असतांना ही यावल येथील जिल्हा आदीवासी प्रकल्प कार्यालयाकडून तासिका तत्वावरील कर्मचार्यांना शाळांवरील कामात सामावुन घेतले जात नसल्याने या कृतीच्या विरोधात आजपासुन जिल्ह्यातील आदीवासी विकास विभाग वर्ग३व४ रोजंदारी कृती समितीच्या माध्यमातुन रोजंदारी कर्मचार्यांनी आपले आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते.
कृती समितीचे प्रकल्प प्रमुख सावकार बारेला व प्रकल्प प्रमुख पंकज भगवान चवरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू केलेले उपोषणास आदीवासी तडवी , भिल एकता या संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष एम. बी. तडवी यांच्यासह त्यांच्या संघटनेच्या प्रमुख पदधिकार्यांनी उपोषणा ठिकाणी उपस्थित राहुन रोजंदारी कर्मचार्यांच्या मागण्यांना आपला पाठींबा दिला होता. दरम्यान सायंकाळच्या सुमारास एकात्मित आदीवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रभारी प्रकल्प अधिकारी म्हणुन कार्य सांभाळणारे सहाय्यक प्रकल्प अधिकारी ( प्रशासन ) प्रशांत माहूरे यांनी दिलेल्या लिखीत आश्वासनांतर उपोषण स्थगित करण्यात आले आहे. या आमरण उपोषणात बालुसिंग सुरमल पावरा , सुलेमान अरमान तडवी, चित्रकला गुलाब बारेला, रेणुका प्रकाश सोनवणे, मजीत सिकंदर तडवी , देविदास भागवत कोळी ,समाधान भिमराव सोनवणे , राजेश भारसिंग पावरा , मालती भागवत कुमावत, मालुबाई सुरेश तायडे , समीर फकीरा तडवी, समीर फकीरा तडवी, कृष्णा किल्ल्या पावरा, चंद्रभान जुलाल कोळी, संदीप गोकुळ पाटील, आकाश श्यामराव कापसे, सुभाराम बळीराम बारेला, जिजाबाई चिंतामण मोरे, सुनिता शशीकांत नानकर, सुभाष महादु वाघ यांच्यासह मोठया संख्येत रोजंदारी कर्मचारी सहभागी झाले होते.