अखिल भारतीय वारकरी मंडळावर सुर्यभानंद महाराज यांची निवड

 

यावल : प्रतिनिधी । श्री श्री १००८ महामंडलेश्वर हभप सुर्यभाननंद सरस्वती महाराज ( संस्थापक अध्यक्ष संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्था व गोरक्षण शेळगाव ) यांची अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या महाराष्ट्र राज्य सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे .

पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पाळधी येथील फार्म हाऊसवर पार पडलेल्या बैठकीत अखिल भारतीय वारकरी मंडळाचे खान्देश विभागीय अध्यक्ष ह भ प ज्ञानेश्र्वर महाराज नंदुरबारकर, राज्याचे कोषाध्यक्ष ह भ प भावराव महाराज ( मुक्ताईनगर) , ह भ प संजय जमादार ( शिवचरित्रकार कासोदा) व जिल्ह्यातील अखिल भारतीय वारकरी मंडळाचे सर्व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते या बैठकीत ही निवड करण्यात आली .

वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह भ प प्रकाश महाराज बोधले यांनी सुर्यभानंद महाराज यांची निवड जाहीर केली .

Protected Content