मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबई येथील जवाहरलाल नेहरू कस्टम हाऊस, न्हावा शेवा बंदरावर विशेष गुप्तचर आणि तपास शाखेने संयुक्त कारवाई करत तस्करी केले जाणारे इलेक्ट्रॉनिक्स साहित्य जप्त केले. धक्कादायक म्हणजे बाजारात या वस्तुंची किंमत सुमारे 4.11 कोटी रुपये इतकी असल्याची प्राथमिक माहिती आहे. जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक्स साहित्यामध्ये प्रामुख्याने वापरलेले परंतू नूतनीकरण केलेले 4,600 लॅपटॉप, सुमारे 1,546 सीपीयू आदी वस्तुंचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे हे लॅपटॉप आणि सीपीयू डेल, एचपी आणि लेनोवो यांसारख्या विविध ब्रँड्सचे आहेत. जे हाँगकाँगमधील पुरवठादारासह यूएईमधून आयात करण्यात आले होते.
न्हावा शेवा कस्टमने माहिती देताना सांगितले की, प्राप्त माहितीनुसार, एसआयआयबीने विशिष्ट बुद्धिमत्ता विकसित केली आहे. ज्यामुळे सदर तस्करीच्या वस्तुंबाबत वस्तुनिष्ठ माहिती मिळू शकली. एसआयआयबी, आणि जेएनसीएच अधिकाऱ्यांनी ही माहिती त्यांच्या दिल्लीतील अधिकाऱ्यांसोबत सामायिक केली. ज्यामुळे दिल्ली येथेही मुंबईप्रमाणेच कारवाई करत सुमारे 2100 जुने आणि वापरलेले लॅपटॉप जप्त करण्यात आले.