धरणगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील जांभोरा शिवारातील शेतात असलेल्या विहिरीत झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे विहिरीतील विद्युत पंप आणि केबल वायर जळून नुकसान झाल्याची घटना घडली आहे. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली.
राजेंद्र मगन पवार वय 53 राहणार जांभोरा तालुका धरणगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून शेती काम करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. त्यांचे जांभोरा शिवारातील शेत गट क्रमांक १८९/२ मध्ये शेत आहे या शेतातील विहिरीत २५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता शॉर्ट सर्किट झाल्यामुळे विहिरीतील पाण्याची मोटार आणि इलेक्ट्रिक केबल वायर जळून नुकसान झाले आहेत या संदर्भात शेतकरी राजेंद्र पवार यांनी धरणगाव पोलिसात धाव घेऊन खबर दिली त्यानुसार शनिवारी २६ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस नाईक दीपक पाटील करीत आहे.