जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टी महानगरच्या युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदी महेश रमेश पाटील यांची निवड माजी प्रदेश संघटन मंत्री तथा विधानपरिषद आमदार श्रीकांत भारतीय, आ.सुरेश भोळे, जिल्हाध्यक्षा उज्वला बेंडाळे, खा. उन्मेषदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली.
महेश पाटील यांनी भारतीय जनता पार्टीत अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या असून ते गेल्या ५ वर्षापासून भाजपा युवा मोर्चा सक्रिय आहेत. त्यांचे उत्कृष्ट संघटन कौशल्य व सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवड आहे. सध्या ते आनंद फाउंडेशनचे उपाध्यक्ष तसेच विविध सामाजिक जनहितार्थ उपक्रम राबवून राबवत आहेत. आगामी काळात युवा मोर्चाच्या माध्यमातून युवकांसाठी विविध उपक्रम राबविण्याचा त्यांचा मानस आहे.
महेश पाटील यांच्या निवडी बद्दल महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आ.सुरेश भोळे, जळगाव महानगर जिल्हाध्यक्षा उज्वला बेंडाळे, प्रदेश युवा मोर्चा अध्यक्ष राहुल लोणीकर, जिल्हा सरचिटणीस राधेश्याम चौधरी, अमित भाटीया, महेश जोशी, अरविंद देशमुख, जितेंद्र मराठे, ज्योतीताई निंभोरे तसेच जिल्हा पदाधिकारी, मंडल पदाधिकारी, मोर्चा, आघाडी व प्रकोष्ठ, शक्तीकेंद्र प्रमुख, सुपर वॉरिअर, व बूथ प्रमुख यांनी अभिनंदन केले आहे.