राज्यात शिवभोजन योजनेला मान्यता; १० रूपयात मिळणार थाळी !

uddhav thackera 11

मुंबई प्रतिनिधी । अवघ्या १० रूपयात जेवणाची थाळी देण्याची सुविधा असणार्‍या शिवभोजन योजनेला आज राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात शिवसेना सत्तेवर आल्यास दहा रूपयात जेवणाची थाळी देणार असल्याची घोषणा केली होती. यानुसार ही योजना लागू करण्यात येणार असल्याचे संकेत आधीच मिळाले होते. आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत या योजनेला मान्यता देण्यात आली. ही योजना प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येणार आहे. यासाठी तीन महिन्यात ६ कोटी ४८ लक्ष खर्च अपेक्षित आहे. सुरुवातील प्रायोगिक तत्त्वावर ५० ठिकाणी हे शिवभोजन मिळणार आहे. आज मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेला मान्यता मिळाली. याशिवाय, महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या आराखड्यासही मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

Protected Content