सुप्रिम कॉलनीतून व्यावसायीकाची दुचाकी लंपास

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरातून उमरखैय्याम अब्दुल हक सैय्यद (वय-४८) यांची दुचाकी लांबवल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील सुप्रिम कॉलनीतील जमजम नगरात उमरखैय्याम अब्दुल हक सैय्यद हे वास्तव्यास असून त्यांच्याकडे (एमएच १८ टी ९६०२) क्रमाकांची दुचाकी आहे. त्यांनी दुचाकी घरासमोर लावलेली होती. दरम्यान, चोरट्यांनी दि. १३ जानेवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या घरासमोरुन दुचाकी चोरुन नेली. हा प्रकार दुसऱ्या दिवशी उघडकीस आल्यानंतर त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला. मात्र तरी देखील त्यांना दुचाकी मिळून न आल्याने अखेर त्यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरटयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्सटेबल दत्तात्रय बडगुजर हे करीत आहे.

Protected Content