यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेच्या नुतन पदाधिकारी यांची शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून तालुक्यातील चिंचोली येथील गोपाळ चौधरी यांची जिल्हा उपप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.
संपूर्ण राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून शिवसेना पक्षाअंतर्गत फेरबदल करण्यात आले आहेत. विरावली तालुका यावल येथील तुषार उर्फ मुन्ना पाटील यांनी शिवसेनेचे दोन गट निर्माण झाल्याने अखेर त्यांनी शिवसेनेच्या पक्षाअंतर्गत कार्य पद्धतीवर नाराजी व्यक्त करीत आपल्या शिवसेना जिल्हा उपप्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यामागे ते शिवसेनेचे की शिंदे गटाचे अशा प्रकारच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या असतांना शिवसेनाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून अधिकृतरित्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.
यात शिवसेना जिल्हा उपप्रमुखपदी चिंचोली तालुका यावल येथील गोपाळ चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. तालुक्यात कोण कोणत्या गटाला या संपूर्ण चर्चला आता पुर्णविराम मिळाला आहे. गोपाळ चौधरी यांच्या निवडीचे यावल परिसर व चोपडा मतदारसंघात शिवसेनिकांच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे.