भुसावळ प्रतिनिधी । शहरातील पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाची बिनविरोध करण्यात आली असून सभापतीपदी वंदना उन्हाळे तर उपसभापतीपदी प्रिती पाटील यांची निवड झाली आहे.
शहरातील पंचायत समिती कार्यालयात नुकतेच तहसीलदार दिपक धिवरे यांच्या अध्यक्षतेखाली सभापती पदाचा अर्ज भरण्याची वेळ निश्चित करण्यात आलेली होती. वेळेच्या आत आलेल्या अर्ज स्वीकारून दुपारी ३.०० वाजेला अर्जाची छाननी मा.तहसीलदार यांनी करून अर्ज देणाऱ्यांची ५ मिनिटांचा अवधी माघार घेण्यासाठी देण्यात आलेला आहे.
सदर सभापती पदासाठी एक अर्ज व उपसभपती पदासाठी एक अर्ज आल्याने दोघ अर्ज वैध असल्याने अध्यक्षांनी सभापती पदासाठी आलेल्या वंदना उन्हाळे उमेदारांच्या नावाची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.तर उपसभपती पदासाठी प्रिती पाटील या उमेदारांच्या नावाची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. तसेच तहसीलदार दिपक धिवरे, पंचायत समितीचे बिडिओ, तहसील कार्यालयाचे भाऊसाहेब शिरसाठ व पंचायत समितीचे अधिकारी यांनी नूतन निवड झालेले सभापती व उपसभापती यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
आमदार संजय सावकारे यांनी दिल्या शुभेच्छा
पंचायत समितीमध्ये आजरोजी सभापती व उपसभापती पदाची नुकतीच निवड प्रक्रिया पार पडली असून सभापती पदी वंदना उन्हाळे तर उपसभापती पदी प्रिती पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याने भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे यांनी पंचायत समितीच्या सभागृहात सभापती व उपसभापती दोघांना शुभेच्छा दिल्या.
सभापती वंदना उन्हाळे
आज रोजी माझी बिनविरोध झाल्याने सर्वात प्रथम शिक्षण व आरोग्याकडे लक्ष देणार आहे. कोरोनामुळे जी जीवितहानी झाली ती परिस्थिती पुढे येऊ नये यासाठी योग्य ती उपाय योजना करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच कोरोनाच्या काळात शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले त्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहील. लवकरच उन्हाळा सुरू होणार असून गावातील नागरिकांना पाण्याची टंचाईचा प्रश्न निर्माण होतो ती होऊ नये यादृष्टीने पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करेल.तसेच गावातील रस्त्यांचे डांबरीकरण करणार असल्याचे नूतन सभापती यांनी सांगितले.
उपसभापती प्रिती पाटील
आमचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे, खासदार रक्षाताई खडसे, आमदार संजय सावकारे यांच्यामुळे मी आज या स्थितीला पोहचली आहे. पदावर विराजमान झाल्यानंतर विकास कामे करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य मिळाल्यास जोमाने काम करू अशी माहिती नूतन उपसभापती यांनी दिली.