देशात राष्ट्रीय एकात्मता नष्ट करणारे प्रयोग-शिवसेना

मुंबई प्रतिनिधी । देशद्रोही शर्जीलच्या अटकेचे समर्थन करतांनाच देशात राष्ट्रीय एकात्मता संपविण्याचे प्रयोग सुरू असल्याची टीका आज शिवसेनेने आपले मुखपत्र असणार्‍या दैनिक सामनातून केली आहे.

दैनिक सामनाच्या आजच्या अग्रलेखात म्हटले आहे की, हिंदुस्थानचे तुकडे करण्याची भाषा करणार्‍या शर्जील इमाम याला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाली. आम्ही एकत्र आलो तर ईशान्य भाग हिंदुस्थानपासून तोडू शकतो. आसाम हिंदुस्थानपासून कापू शकतो,फफ असे वक्तव्य करून या शर्जीलने देशातील मुस्लिम समाजाचीच मान कापली आहे. शर्जीलच्या वक्तव्यामुळे भारतीय जनता पक्षाला प्रचारासाठी आयतेच कोलीत मिळाले आहे. शर्जीलचे वक्तव्य हे फुटीरतावादी व देशद्रोहीच आहे. दिल्लीत कोणाचेही सरकार असते तरी त्यांना शर्जीलला बेडया ठोकाव्याच लागल्या असत्या. त्यामुळे शर्जीलला अटक करून उधळलेल्या हत्तीस अटक केली या भ्रमातून भगतगणांनी बाहेर पडले पाहिजे. गृहमंत्री अमित शहा जाहीर सभांतून विचारत आहेत की, ङ्गङ्घतुम्ही शर्जीलची चित्रफीत पाहिली का? कन्हैया कुमारच्या शब्दांपेक्षा ती अधिक धोकादायक आहे. आसामला हिंदुस्थानपासून तोडण्याची भाषा शर्जीलने केली. मात्र त्याच्या सात पिढ्यांनाही ते शक्य होणार नाही.फफ आम्ही केंद्रीय गृहमंत्र्यांच्या जोरदार वक्तव्याशी सहमत आहोत.
देश तोडण्याची भाषा गेल्या पाचेक वर्षांतच का वाढीस लागली व ही भाषा करणार्यात शिकल्या-सवरलेल्या तरुणांचाच का भरणा आहे? हा संशोधनाचा विषय आहे.

अग्रलेखेत पुढे म्हटले आहे की, देशातील सामाजिक, धार्मिक एकोपा जवळजवळ संपला आहे. मुसलमान आणि हिंदूंत वर्गकलह घडावा, इराक, अफगाणिस्तानप्रमाणे न संपणारे अराजक, नागरी युद्ध चालत राहावे अशाप्रकारचे कारस्थान सुरू आहे. त्यास खतपाणी घालणारे उद्योग ङ्गराजकीय प्रयोगशाळेतफ चालले आहेत. ङ्गराष्ट्रीय एकात्मताफ हा शब्दच नष्ट करणारे हे प्रयोग विद्रोहाच्या ठिणग्या निर्माण करणार असतील तर भविष्य आजच संपले असे मानायला हरकत नाही. शहरी नक्षलवाद आहेच. त्याचबरोबर उच्चभ्रू, उच्च शिक्षितांचा दहशतवाद वाढावा यासाठी राजकारणी विष कालवत असतील तर दुसरे काय होणार! एका शर्जीलला आज पकडले. दुसरा शर्जील निर्माण होणार नाही हीदेखील जबाबदारी सरकारची असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.

Protected Content