मुंबई (वृत्तसंस्था) मतदार केंद्रावर मोबाईल घेऊन जाणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे. फक्त मोबाईलच नव्हे तर कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण मतदान केंद्राच्या 100 मीटर अंतरावर नेऊ नये, अशी सक्त ताकीद निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकांमध्ये मतदान केंद्रामध्ये मोबाईलने अनेक जणांनी फेसबुक लाईव्ह तसेच शुटिंग करून गुप्त मतदानाची प्रक्रियाच नष्ट केली होती. म्हणून आता निवडणूक आयोगाने ही खबरदारी घेतली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यामध्ये 29 एप्रिल रोजी राज्यातील 17 मतदारसंघामध्ये मतदान होत आहे. उद्या नंदुरबार, धुळे, दिंडोरी,नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण,मावळ, शिरुर आणि शिर्डी या लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे.