अमळनेर : प्रभाग गट रचना रद्द करण्याच्या मागणीची निवडणूक आयोगाने घेतली दखल

अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-२०२२ प्रभाग रचना रद्द करुन फेर प्रभाग रचना करण्याबाबत आ. शिरिष चौधरी मित्र परिवार आघाडीचे गटनेते प्रविण पाठक यांनी तक्रार केली होती. या तक्रारीची निवडणूक आयोगाने दखल घेतली असून वरिष्ठ स्तरावरून चौकशीचे आदेश प्राप्त झाल्याने सदर प्रभाग रचना रद्द करून जिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी मार्फत सदर प्रभाग रचना करण्यात यावी, असे मत यावेळी पाठक यांनी  व्यक्त केले आहे.

येथील अमळनेर नगरपरिषद निवडणूकीचा अनुषंगाने महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार कच्चा प्रभाग रचनेचे काम सुरू होते. त्या दरम्यान सदर प्रभाग रचना करतांना आयोग व विभागाचा आदेश नुसार गोपनीयता पाळणे ,राजकीय हस्तक्षेप टाळणे अपेक्षित असताना विशिष्ट गटास त्रास होईल,गैरसोय होईल अश्या पध्दतीने प्रभाग रचना झाल्याची चर्चा शहरात सुरू असतांना आमदार शिरिष चौधरी मित्र परिवार आघाडीचे गटनेते प्रविण पाठक यांनी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांचे नोटीस दिनांक 21/12/2021 जा. क्र.वशी 1/395/2021 धागा पकडत गोपनीयतेचा भंग झाल्याचे स्पष्ट होत आहे. अश्या अशायची तक्रार निवडणूक आयोग, प्रधान सचिव नगरविकास, जिल्हाधिकारी जळगांव यांचा कडे केली होती. सदर प्रभाग रचना करतांना राजकीय हस्तक्षेप झाल्याचे जाणवत आहे असा आरोप केला आहे. पाठक यांचा तक्रारीची निवडणूक आयोगाने दखल घेत जिल्हाधिकारी, जळगांव यांना तात्काळ क्र. रानिआ/नप-2022/सं.क्र.120/का-6 नुसार चौकशी करून अहवाल दाखल करण्याचे आदेश दिले आहे. तसे पत्र पाठक यांना आज रोजी प्राप्त झाले आहे. वरिष्ठ स्तरावरून चौकशी चे आदेश प्राप्त झाल्याने सदर प्रभाग रचना रद्द करून जिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी मार्फत सदर प्रभाग रचना करण्यात यावी असे मत यावेळी श्री पाठक यांनी व्यक्त केले आहे.

 

Protected Content