जळगावात निवडणूक आयोगाचा निषेध (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने गोठविल्यानंतर आज उध्दव ठाकरे यांच्या गटातर्फे जळगावात याचा निषेध करण्यात आला. यात महापालिकेसमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

 

शिवसेना महानगरतर्फे महापालिकेच्या सतरा मजली प्रशासकीय इमारतीजवळ केंद्रीय निवडणूक आयोगाचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी शिवसैनिकांच्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. याप्रसंगी  सरकार हमसे डरती है निवडणूक आयोग को आगे करती है,पन्नास खोके खाऊन खाऊन माजले बोके आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या.

याप्रसंगी शिवसेना लोकसभा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, धरणगाव मा. नगराध्यक्ष निलेश चौधरी, समन्वयक अंकुश कोळी, युवासेना जिल्हा प्रमुख पियूष गांधी, महीला आघाडी जिल्हा प्रमुख महानंदा पाटील, अल्पसंख्यांक आघाडीचे जकीर पठाण, मंगला बारी, मनीषा पाटील, निता सांगोळे, गायत्री सोनवणे, नीलू इंगळे, शीला रगरे, विमल वाणी, श्रध्दा घोष, युवा सेना महानगर प्रमुख यश सपकाळे, अमोल मोरे, उप महानगर प्रमुख प्रशांत सुरळकर, गणेश गायकवाड, फरीद खान, जीलानी शेख, जितू साळुंके, युवासेना उप जिल्हाप्रमुख विशाल वाणी, धरणगाव मा. नगरसेवक भागवत चौधरी, राजेंद्र ठाकरे, संतोष सोनवणे, विजय लाड, दीपक सोनवणे, गजानन माळी, नंदलाल पाटील, जयेश महाजन, विशाल काळे, शुभम निकम, विजय पाटील, वसंत सोनवणे, छोटू जोगी, हर्षल चौधरी, प्रतीक पाटील, रोहन सपकाळे, शेखर धनगर, विनोद गायकवाड, रुपेश भाकरे, संजय बाविस्कर, महेश पाटील, शुभम निकम, अंकित कासार, श्रीकांत आगळे, अॅड. शरद माळी, अमोल चौधरी, ईश्वर राजपूत, अमित जगताप, लखन सांगीले, नरेश पाटील, शुभम पाटील, अमळनेर तालुका प्रमुख विजय पाटील, श्रीकांत पाटील, सूरज परदेशी, सुलतान खान, अविनाश पाटी,ल विठल कोल्हे, महेश ठाकूर, विवेक पाटील, पुनम राजपूत, जुबेर शेख, डॉ. मोहसीन पिंजारी, मतीन सय्यद, सुनील ठाकूर यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Protected Content