Home क्राईम दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तिघांकडून तरूणावर चॉपर हल्ला; एकाला अटक

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तिघांकडून तरूणावर चॉपर हल्ला; एकाला अटक

0
103


जळगाव प्रतिनिधी । मैत्रिणीसह मेहरूण तलावार वॉकींग करणाऱ्या तरूणाला अनोळखी तिघांना दारू पिण्यासाठी पैसे मागण्यावरून तरूणावर चॉपर हल्ला करून मारहाण केल्याची घटना मंगळवारी सांयकाळी घडली. एकाला अटक करण्यात आले असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, इंद्रजित हेमंत देशमुख (वय-२५) रा. प्लॉट नं.३०, उत्कर्ष सोसायटी, आदर्श नगर हा गावाहून आलेल्या मैत्रिणीसोबत १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता शहरातील मेहरूण तलावाजवळ वॉकिंग करण्यासाठी गेले. त्यावेळी तीन अनोळखी व्यक्ती अचानकपणे समोर येवून एकाने दारू पिण्यासाठी पैसे मागितले. तेव्हा माझ्याकडे पैसे नाही असे सांगितल्यावर मारहाण करण्यास सुरूवात केली. दुसऱ्याने मैत्रिणीशी झटापट सुरू केली व तिच्या हातातील २५ हजार रूपये किंमतीचा मोबाईल बळजबरी हिसकावून घेतला. तर तिसऱ्या व्यक्तीन धारदार चॉपर काढून धाक दाखवत मारहाण केली. तिसऱ्याने इंद्रजितच्या पोटाच्या डाव्या बाजूला वार करून जखमी केले. व इंद्रजितच्या खिश्यातील मोबाईल काढून दुचाकीने पळ काढला. याप्रकरणी इंद्रजित देशमुख याच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपी राहुल राजू गवळी (वय-२०) रा. गवळी वाडा, तांबापूरा याला अटक करण्यात आली. संशयित साथिदार शकील शहा रूबाब शहा रा. तांबापूरा आणि कलीमुद्दीन शेख उर्फ माकोडा हे फरार आहे. फरार झालेल्या दोघांचा शोध घेणे सुरू आहे.


Protected Content

Play sound