विषारी औषध घेतल्याने वृध्द महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील खेडी खुर्द येथील ६९ वर्षे वृद्ध महिलेने शेतात लागणारे तणनाशक विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी रात्री घडकीला आली आहे. या संदर्भात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नेांद करण्यात आली आहे.  दर्गाबाई भिकाजी सोनवणे (वय-६९) रा.खेडी ता.जि.जळगाव) असे मयत झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे.

यासंदर्भात माहिती अशी की, दुर्गा भिकाजी सोनवणे (वय-६९) या महिला आपल्या परिवारासह खेडी खुर्द ता.जि. जळगाव येथे वास्तव्याला होत्या. गुरुवार १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता त्यांनी शेतात गवतावर मारणारे तणनाशक विषारी औषध सेवन केले. त्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागले, त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना रात्री ९ वाजता त्यांचा मृत्यू झाला,  आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. यासंदर्भात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशिरा अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रामकृष्ण इंगळे करीत आहे.

 

Protected Content