जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील भादली गावात वृध्द महिलेच्या सुनेला अश्लिल इशारा केल्याच्या जाब विचारल्याच्या कारणावरून शिवीगाळ करत चार जणांनी वृध्द महिलेला लाकडी दांडक्याने मारहाण करून दुखापत केल्याची घटना बुधवारी १४ मे रोजी सकाळी ९ वाजता घडली आहे. या संदर्भात सायंकाळी ६ वाजता नशिराबाद पोलीस ठाणे चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील भादली गावामध्ये लताबाई पुंडलिक कोळी वय-६०, या वृत्त महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. बुधवार १४ मे रोजी सकाळी ९ वाजता वृद्ध महिलेची सुन ही घरी असतांना गल्लीत रा.सोनू कोळी याने अश्लिल इशारे केला याचा जाब लताबाई कोळी यांनी विचारला. याचा राग आल्याने प्रकाश कोळी, मीराबाई कोळी, निखिल कोळी, सोनू कोळी या चौघांनी वृद्ध महिलेला शिवीगाळ करत लाकडीकाठ्यांनी बेदम मारहाण करून गंभीर व दुखापत केली आहे. दरम्यान या संदर्भात लताबाई कोळी यांनी नशिराबाद पोलिसात या संदर्भात तक्रार दिली. त्यानुसार मारहाण करणारे प्रकाश कोळी, मीराबाई कोळी, निखिल कोळी आणि सोनू कोळी या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल अनिल देशमुख करीत आहे.