
चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे गावात राहणाऱ्या एका प्रौढाचा नदीपात्रात बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत मेहुणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आण्णा शंकर तीरमली वय ५८ रा. वरखेडे खुर्द ता.चाळीसगाव असे मयत झालेल्या प्रौढाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील खर्दे गावात आण्णा तिरमली हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला होते. रविवारी २० ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास चाळीसगाव शहर पासून जवळ असलेल्या नदीपात्रात त्यांचा पाय घसरून पाडल्याने त्यांचा पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांसह पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह चाळीसगाव उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. दरम्यान या संदर्भात मेहुणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ मोहन सोनवणे हे करीत आहे.



