जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बी.जे.मार्केट परिसरातील सीट कव्हर दुकानावमोर अंदाजे ६० वर्षीय वृध्द बेशुध्दावस्थेत आढळून आले होते. वृध्दाला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव शहरातील बी.जे. मार्केट परिसरात शुक्रवारी ८ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता एक ६० वर्षीय अनोळखी वृध्द बेशुध्दावस्थेत पडलेले असल्याचे विनोद रोहिदास जाधव रा. शिवाजी नगर, जळगाव या तरूणाच्या निदर्शनास आले. त्याने खासगी वाहनाने अनोळखी वृध्दाला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. दरम्यान, शनिवारी ९ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता वृध्दाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतदेह शवविच्छेदन गृहात नेण्यात आला असून मयताची ओळख पटविण्याचे आवाहन जिल्हापेठ पोलीसांनी केले आहे. याचा पुढील तपास पोलीस नाईक बापुराव बडगुजर करीत आहे.