पुण्यात क्रेनने वृध्द सायकलस्वाराला चिरडले

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पुण्यातील कर्वे रोड परिसरात क्रेनने चिरडल्याने एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी क्रेन चालकाला पोलिसांनी अटक केली असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. मात्र, या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

देवळी असे क्रेनखाली चिरडून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. देवळी हे मजूर असून कोथरूड येथील रहिवासी आहेत. मयत आज सकाळी सायकलवरून कामावर जाताना कर्वे रोडवरील सोनल हॉलजवळ क्रेनने त्यांना चिरडले. या अपघातात देवळी यांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती डेक्कन पोलिसांनी दिली. याप्रकरणी क्रेन चालक सलीम अली याला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपासाला सुरुवात केली.

Protected Content