मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना उपचारासाठी जळगावहून मुंबई येथे हलविण्यात येत असल्याचे वृत्त आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, आमदार एकनाथराव खडसे यांची प्रकृती आज दुपारी अचानक खालावली. यामुळे त्यांना जळगाव येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. येथून त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे नेण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. जळगाव विमानतळावरून त्यांना एयर अँब्युलन्सने मुंबई येथे नेण्यात येणार असल्याचे समजते. याबाबतचे वृत्त टिव्ही नाईन या वाहिनीने दिले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत माहिती देखील दिली आहे.
सध्या आमदार एकनाथराव खडसे यांच्यावर जळगावातील गजानन हार्टकेअर हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. येथे त्यांच्या चाचण्या करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आला असून त्यांना एयर अँब्युलन्सने मुंबई येथे नेण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतची व्यवस्था केली आहे.
(सविस्तर वृत्त लवकरच )