दोन लाख रूपये ठेवलेली पिशवी धुमस्टाईल लांबविली

मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांनी गुन्हा दाखल

मुक्ताईनगर -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर शहरातील पूजा सुपर शॉपी समोर रस्त्याने पायी जात असलेल्या पिंप्रीपंचम येथील वृद्ध शेतकऱ्याच्या हातातील २ लाख रुपये ठेवलेले पिशवी अज्ञात दोन जणांनी दुचाकीवर येऊन हिसकावून धुमस्टाईल पसार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात २ जणांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की भगवान विश्वनाथ पाटील (वय-65, रा. पिंप्रीपंचम ता. मुक्ताईनगर) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शुक्रवारी ३ नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता ते मुक्ताईनगर शहरात आले होते. बँकेतून त्यांनी दोन लाख रुपये रोकड काढली होती व बसस्थानककडे जाण्यासाठी निघाले. पूजा सुपर शॉपी समोरील डिव्हायडर जवळून पायी जात असताना मागून अज्ञात दोन जण दुचाकीवर येऊन त्यांच्या हातातील २ लाख रुपये ठेवलेली रोकडची पिश. दरम्यान त्यांनी तातडीने मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अद्याप २ जणांविरोधात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल बोरकर करीत आहे.

Protected Content