मुंबई प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक मुंबईत सुरू असून यात भाजपचे मातब्बर नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या पक्ष प्रवेशाबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
भाजपवर नाराज असणारे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी अलीकडेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला असल्याने ते पक्षांतराच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मध्यंतरी जयंत पाटील हे जळगाव दौर्यावर येणार असल्याची चर्चा रंगली होती. त्यांचा कथित दौरा रद्द झाला असला तरी आज याबाबत मुंबईत बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल आदींसारखे मातब्बर नेते हजर आहेत. तर जिल्ह्यातून माजी मंत्री गुलाबराव देवकर व आमदार अनिल भाईदास पाटील यांचीही उपस्थिती आहे.
या बैठकीत एकनाथराव खडसे यांच्या पक्षातील प्रवेशाबाबत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.