मुंबई प्रतिनिधी । माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज महसूल मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
माजी मंत्री एकनाथराव खडसे हे बर्याच दिवसांपासून मुंबईत असून त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह अनेक मान्यवरांच्या भेटी घेतल्या आहेत. तर सुप्रीया सुळे यांच्यासह अनेक नेत्यांनी खडसे यांच्या मुंबई येथील निवासस्थानी भेट दिली आहे.
या अनुषंगाने आज नाथाभाऊंनी महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा केली. याप्रसंगी आमदार रोहित पवार यांची देखील उपस्थिती होती.
महापौर व उपमहापौरांच्या उपस्थितीत विकासकामांना प्रारंभ