एकनाथ खडसे ईडीच्या कार्यालयात दाखल

मुंबई प्रतिनिधी | माजी मंत्री एकनाथराव खडसे हे ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी जाणार असल्याचे स्पष्ट झाले असून ते यासाठी ईडीच्या ऑफिसमध्ये दाखल झाले आहेत.

याबाबत वृत्त असे की, माजी मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश दयाराम चौधरी यांना काल सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने अटक केली आहे. त्यांना पाच दिवसांची कोठडी देखील सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी खुद्द खडसे आणि त्यांच्या सौभाग्यवती मंदा खडसे यांच्यावरही कारवाईची शक्यता आहे.

या अनुषंगाने काल सायंकाळी एकनाथराव खडसे यांना उद्या अर्थात दिनांक ८ जुलै रोजी सकाळी अकरा वाजता ईडीच्या मुंबई येथील कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. याबाबतचे समन्स त्यांना जारी करण्यात आले आहे. ते ईडीच्या कार्यालयात जाण्याआधी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेणार असल्याचे पक्षाने जाहीर केले होते. यानंतर मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसने एका ट्विटच्या माध्यमातून एकनाथराव खडसे यांची प्रकृती बिघडल्यामुळे आजची पत्रकार परिषद रद्द करण्यात येत असल्याची माहिती दिली. यामुळे ही पत्रकार परिषद रद्द झाली आहे.

यानंतर एकनाथराव खडसे यांनी ईडीच्या कार्यालयात जाण्याची तयारी दाखविली आहे. या अनुषंगाने ते आज सकाळी ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!