भुसावळ – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | गुलाबराव तुमच्या नावाची सुरुवातच खराब आहे, अशी जोरदार टिका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जाहीर सभेत केली.
जळगाव जिल्ह्याचे राजकारण खूप तापले आहे, एकीकडे एकनाथराव खडसे ,गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्या मध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी जोरदार झाडल्या जात आहेत, आज भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जाहीर सभा घेण्यात आली, यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर तोफ डागली, गुलाबराव तुमच्या नावाची सुरुवातच खराब आहे, अशी जोरदार ठिका एकनाथराव खडसे यांनी केली आहे.
भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा परिसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते ,यावेळी एकनाथराव खडसे हे मेळाव्याला संबोधित करत असताना गुलाबराव पाटील यांच्यावरती एकनाथराव खडसे यांनी जोरदार तोफ डागली आहे, गुलाबराव तुमच्या नावाची सुरूवातच गहाण आहे, नाथाभाऊ ला हरवण्यासाठी सर्व पक्ष एक आहेत ,परंतु नाथाभाऊ हरणार नाही, बोदवड मध्ये भाजपा बरोबर छुपी युती करून सत्ता काबीज केली, परंतु आता तसे होणार नाही असे एकनाथराव खडसे परिसंवाद मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला