जळगाव (प्रतिनिधी) शहरातील विवेकानंद प्रतिष्ठान संचलित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलची सहल आदर्शगाव फुलगाव येथे नुकतीच नेण्यात आली होती.
इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल आदर्शगाव नेण्यामागचे कारण म्हणजे मुलांना गावातील जीवन शाळा ग्रामीण जीवन रस्ते शेती व्यवसाय सैनिकी कुटुंब व इतर पारंपारिक ग्रामीण जीवनाची माहिती मिळावी हे होते. त्यावेळी तेथील ग्रामपंचायत सदस्य नितीन भालेराव, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र चौधरी, पंचायत समिती सदस्य अनिल झांबरे, पोलीस पाटील प्रवीण महाजन, माजी सैनिक एकनाथ कोलते, आशिष शिंदे आदी उपस्थित होते. माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र चौधरी यांनी फुलगाव हे आदर्श गाव कसे बनले. तसेच त्यासाठी त्यांनी सरकारी सुविधांचा कसा वापर करून घेतला. याविषयी माहिती मुलांना दिली. गावाला मिळालेला आदर्श पुरस्कार स्वच्छता अभियान संत गाडगेबाबा पुरस्का सारखे पुरस्कार मिळाले त्या पुरस्कारांचे स्वरूप रोख रक्कम व स्मृतिचिन्ह होते. तसेच पर्यावरणाचा समतोल कसा राखला जाईल. त्यासाठी त्यांनी ‘झाडे लावा, झाडे जगवा’, ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ अशा अनेक योजनांची माहिती दिली.
माजी सैनिक एकनाथ कोलते यांनी देखील त्याचे त्यांचे लष्करी सेवेतील अनुभव मुलांना सांगितले. तन्मय चौधरी, पार्थ नारखेडे, तन्मय पाचपोल, सृष्टी कोकंदे, गौरी पालवे, अनन्या पाटील, कृष्ण वाडीले, सुदाम अडकमोल या विद्यार्थ्यांना सरपंच, तलाठी, पोलीस पाटील, माजी सैनिक व ग्रामस्थ मंडळी यांची प्रत्यक्ष मुलाखत घेतली. सहलीमध्ये मुलांना खेड्यातील जीवन कसे चालते? त्याचे प्रात्यक्षिक कुंभार कडून दाखवण्यात आले. मुलांनी मडके बनवणे याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. बैलगाडीतून फेरफटका मारीत सहलीचा आनंद लुटला. सहलीमध्ये शाळेच्या समन्वयिका स्वाती आहेराव, चित्रा पाटील, समाधान पाटील, मयुरी सुलक्षणे, नरेंद्र भोई, प्रदीप पाटील, स्नेहा पाटील, अरुण पाटील, नीलेश बडगुजर,अनिल कोथळकर, स्नेहलता रणधीर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.