आर्थिक मंदीचा फटका ; १६ लाख तरुणांचा रोजगार गेला !

Berojgari 1

 

मुंबई प्रतिनिधी । आर्थिक मंदीचा देशभरातल्या रोजगार निर्मितीला फटका बसला आहे. या आर्थिक वर्षात गेल्या वर्षीच्या तुलनेत नवी रोजगार निर्मिती कमी झाली असून यंदा तब्बल १६ लाख नोकऱ्या कमी झाल्या आहेत.

एसबीआय रिसर्च रिपोर्ट इकोरॅपच्या अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे. यंदा सुरू असलेल्या आर्थिक वर्षात जवळपास १६ लाख नोकऱ्या कमी झाल्या आहेत. मागील वर्षी एकूण ८९.७ लाख नोकऱ्यांची निर्मिती झाली होती. त्यात यंदाच्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षात घट होणार आहे. या अहवालानुसार आसाम, बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेश, ओडिशा आदी राज्यांमधील नागरीक नोकरीच्या निमित्ताने परराज्यात, दुसऱ्या ठिकाणी वास्तव्यास आहेत, त्यांच्याकडून घरी पाठवण्यात येणाऱ्या रक्कमेत घट झाली असल्याचे समोर आले आहे. पंजाब, गुजरात, महाराष्ट्र या राज्यात रोजगाराच्या संधी होत्या. मात्र, याच राज्यात रोजगारांच्या संधी कमी झाल्या असल्याचे समोर आले आहे.

Protected Content