विठ्ठल भेटीची ओढ : संत मुक्‍ताई पालखीचे पंढरपूरकडे होणार प्रस्‍थान

मुक्ताईनगर –  लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । कोरोनामुळे गेली दोन वर्ष आषाढी पायी वारीच्या सोहळ्यात खंड पडला. मात्र मोजक्या वारकऱ्यांमध्ये परंपरा कायम राखली गेली. पण आता कोरोना आवाक्यात आला. त्यामुळे यंदा पायी वारी निघणार असून वारकऱ्यांना विठ्ठल भेटीची ओढ लागली आहे. यातच, येथील आदिशक्ती मुक्ताबाई पालखीचे ३ जूनला पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.

तब्बल दोन वर्षाच्या कोरोनाच्या कालखंडानंतर संत मुक्ताई पालखीचा रथ पंढरपूरला निघणार आहे. आषाढी वारी निमित्त मुक्ताईनगर येथील महाराष्ट्रातील सर्वात महत्वाची मानल्या जाणारी आदिशक्ती मुक्ताबाई ची पालखी 3 जूनला आषाढी वारी निमित्त पंढरपूरकडे निघणार आहे संस्थानच्यावतीने जय्यत तयारी सोहळ्यानिमित्त सुरू झाली आहे पालखीची रंगरंगोटी व वारकरी पोशाख विविध कामे सुरू झाले आहे. दोन वर्षापासून रथ जागेवरच थांबलेला होता मात्र यावर्षी पैदल वारी सोहळा असल्याने मुक्ताबाई संस्थांच्या वतीने रथाची व पालखीची रंगरंगोटी या ठिकाणी जय्यत तयारी सुरू झाली आहे वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचं वातावरण दिसून येत आहे.

 

Protected Content