भुसावळ प्रतिनिधी । भुसावळचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी काही महिन्यापासून भुसावळचा पदभार स्वीकारून कोरोना काळात निस्वार्थी सेवा केली, त्याबद्दल उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांचा राजपूत समाजातर्फे आज कोव्हीड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला आहे.
गेल्या दोन वर्षापासून जगभरात करोना या विषारी विषाणूमुळे आहाकार माजला आहे. या कोरोनामुळे किती मृत्युमुखी पडले तर काहींचे छत्र हरवले पण तरी या कोरोना सारख्या विषाणू वायरस शी गेल्या दोन वर्षापासून पोलीस प्रशासन हे दोन हात करीत आहे. रात्री अपरात्री आपला जीव मुठीत धरून कर्तव्य बजावत असून भुसावळ पोलीस प्रशासनही अशाच प्रकारे आपले कर्तव्य बजावत आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी काही महिन्यापासून भुसावळचा पदभार स्वीकारून कोरोना काळात आपले कर्तव्य चोखपणे बजावत व जागतिक महामारी मध्ये स्वतःच्या जीवाची काळजी न करता मानवता सेवाधर्म हे एकच उद्दिष्ट मनाशी बाळगत जी त्यांनी निस्वार्थी सेवा केली त्याबद्दल उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांचा राजपूत समाजातर्फे आज कोव्हीड योद्धा म्हणून श्री राजपूत करनी सेनेचे कोव्हिड योध्दा चे प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांना छोटेखानी कार्यक्रमध्ये गौरविण्यात आले.
यावेळी राजपूत समाज भूषण योगेंद्र सिंह पाटील काँग्रेस उत्तर महाराष्ट्र समन्वय, ज्येष्ठ पत्रकार संजय सिंह चव्हाण, उद्योजक लीलाधर भोळे, पत्रकार हर्षल पाटील, किशोर सावळे, अभिजीत पाटील, तसेच राजपूत समाजबांधव उपस्थित होते