अज्ञात इसमांकडून एकाला जबर मारहाण!

 

चाळीसगाव: प्रतिनिधी । अज्ञात ठिकाणाहून आलेल्या अनोळखी इसमाने एकाला जबर मारहाण केल्याची घटना पाटणादेवी रोडावर घडली याप्रकरणी शहर पोलिस स्थानकात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कैलास चिंधा पाटील (वय- ३५,  रा. कोदगांव )  परिवारासह वास्तव्यास असून शेती करतात . कैलास पाटील  पाटणादेवी रोडावर मित्रांसोबत उभा असताना अचानक आलेल्या चार अनोळखी इसमांनी येऊन लाकडी दांड्याने त्याच्या खांद्यावर व पाठीवर जबर मारहाण केली. त्याचवेळी सोबत असलेला मित्र मुकूंदा गोविंद चौधरी यांनी मध्यस्थी केली असता त्यालाही चापट बुक्यांनी मारहाण करण्यात आली.  हि घटना ८ ऑगस्ट रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास घडली. यात कैलास चिंधा पाटील याला जबर दुखापत झाल्याने शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत तिन आरोपींचे अंदाजे वय हे २० ते २२ वयोगटातील असल्याचे नमूद करण्यात आले आहे. कैलास चिंधा पाटील याच्या जबाबावरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात भादवी कलम- ३२४, ३२३, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो नि विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास भगवान उमाळे करीत आहेत.

 

Protected Content