महाराष्ट्र शेतकरी संघटनेची शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास करण्याकडे वाटचाल

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ज्या पद्धतीने लोकशाहीला चार आधारस्तंभ असतात अगदी त्याच पद्धतीने शेतकरी कुटुंबालाही चार आधारस्तंभावर अवलंबून राहावे लागते. म्हणून महाराष्ट्र शेतकरी संघटनेचा मूळ उद्देश शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकास करण्यासाठीचा असून त्याकरिता आधारस्तंभ क्रमांक एक शेतकरी, आधारस्तंभ क्रमांक दोन शेतकऱ्यांची पत्नी, आधारस्तंभ क्रमांक तीन त्याचा मुलगा, चार त्याची मुलगी हे असून म्हणून संघटनेच्या माध्यमाने शेतकऱ्यांच्या घरामध्ये शेती व्यतिरिक्त इतर माध्यमातून उत्पन्नाचा स्रोत निर्माण व्हावा.
याकरिता संघटनेच्या महिला पदाधिकारींकरता रोजगार व स्वयं रोजगार निर्मिती प्रकल्पाची सुरुवात संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष शेतकरी नेते सुनील देवरे यांच्या हस्ते महाशिवरात्री व जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून ओमशांती नगर, म्हसवे शिवार पारोळा येथे उद्घाटन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष कल्याणी देवरे या राहणार असून संघटनेचे सर्व पदाधिकारी सह महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे असे आयोजकांमार्फत कळविण्यात आले आहे

Protected Content