कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्या जोगलखेड्याच्या लोकांचे अहवाल निगेटीव्ह

पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील जोगलखेडे येथे एका पॉझिटिव्ह रुग्णाचा निकट संपर्कात आलेले सर्व १४ जणांचे तपासणी अहवाल सुदैवाने निगेटीव्ह आले आहेत.

तालुक्यातील जोगलेखेडे येथे संपर्कात असणार्‍या एकाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे खळबळ उडाली होती. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या १४ जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले असून त्यांचे स्वॅब नमूने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. रविवारी सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये या सर्व जणांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने तालुक्यातील जनतेचा जीव भांड्यात पडला आहे. दरम्यान, या रूग्णांचा अहवाल निगेटीव्ह आला तरी जनतेने सावध राहून लॉकडाऊनच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content