तरुणांनी शैक्षणिक कार्यासाठी पुढे यावे – जितेंद्र पवार

पारोळा, प्रतिनिधी। तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा शेळावे खु या ठिकाणी गुणवंत विदयार्थ्यांना बक्षिसे देण्याचा स्तुत्य उपक्रम सोमवार १६ मार्च घेण्यात आला . ही बक्षिसे गौरव गवांदे – शिंपी, विद्युत सहाय्यक , मंचर पुणे ( पारोळाकर ) यांनी आपल्या वाढदिवसाचा इतर खर्च न करता विदयार्थींसाठी बक्षिसे उपलब्ध करुन देवुन समाजातील युवकांसमोर आदर्श ठेवला आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष शेळावे केंद्र प्रमुख जितेंद्र पवार तर प्रमुख पाहुणे म्हणुन पारोळा तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष गुणवंतराव पाटील , राज्य शिक्षक मनवंतराव साळुंखे , पत्रकार डॉ विजय वंजारी, मुख्याध्यापक हेमराज राजपूत उपस्थित होते. धाबे शाळेचे राज्य शिक्षक मनवंतराव साळुंखे हे प्रत्येक शालेय कार्यक्रम ,उपक्रमात व शिक्षण परिषदेत शैक्षणिक सहभाग तर घेतात पण प्रत्येक आयोजक शाळेतील एक आदर्श विद्यार्थी व विदयार्थीनीसह वर्षभर चुणुक दाखविणाऱ्या गुणवंत विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्य बक्षिसे देतात. तेही प्लास्टिक मुक्तीच्या धरतीवर कापडी पिशवीत पर्यावरण रक्षणाचा संदेश स्वहस्ते लेखन करून देतात . या महिन्याची शिक्षण परिषद कोरोनामुळे होते की नाही असा संभ्रम असल्याने आयोजक शाळा शेळावे खु व उत्रड चे विदयार्थीही या प्रोत्साहन आणि कौतुकापासुन वंचित राहु नयेत म्हणुन आज मधल्या सुटीत हा कार्यक्रम घेण्यात आला. त्यांचे मित्र गौरव गवांदे यांनी ही बक्षिसे आपल्या वाढ दिवसा निमित्त त्यांच्या कडुन देण्याची ईच्छा व्यक्त केल्याने वरील मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आली.  शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत मोरे , केशव बडगुजर , जयश्री बडगुजर , विशाल देशमुख शाळेच्या गुणवत्ता वाढ, शाळेचे बाह्यांग व अंतरंग सुंदर करण्याबरोबर विविध उपक्रम राबवुन विदयार्थांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रयत्न व कार्यमग्न आहेत. यावेळी गौरव गवांदे यांचे केंद्र प्रमुख जितेंद्र पवार यांनी कौतुक करून एवढ्या कमी वयात त्यांचे सामाजिक भान चांगले असुन असेच सर्व सक्षम युवकांनी गोर गरीब बालकांच्या शैक्षणिक मदतीसाठी पुढे येवुन आपले योगदान देण्याचे अवाहन केले .

Protected Content