भुसावळ तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे केळी जमीनदोस्त

वरणगाव प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील वरणगाव शिवारामध्ये काल दुपारी साडेतीनच्या सुमारास अवकाळी वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला असून यात केळी पीक जमीनदोस्त झाली. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

भुसावळ तालुक्यातील वरणगाव शिवारामध्ये वादळी वाऱ्यासह चक्रीवादळाने झोडपले यात शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या असलेल्या केळी पिकाचे होत्याचे नव्हते क्षणात झाले आहे. भरदुपारी अचानक आलेल्या या जोरदार चक्रीवादळाची धडक इतकी जोरदार होती की, त्यात केळीच्या उभ्या बागा पूर्णपणे आडव्या झाल्या त्यामुळे कापणीला आलेल्या केळी पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून शेतकरी आता सरकारच्या मदतीकडे डोळे लावून वाट पाहत आहे.

 

 

 

 

Protected Content