अमळनेर तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे रब्बी पिके जमीनदोस्त

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्याला शनिवारी रात्री पहाटेपासून जोरदार वाऱ्याचा तडाखा बसला असून रब्बी पिके उद्ध्वस्त झाली आहेत. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.

वाऱ्याचा वेग जोरदार असल्याने काही भागात फुलोऱ्यावर आलेल्या रब्बी मका ज्वारी ऊस दादरचे मोठे नुकसान झाले. तसेच रब्बी दादर ज्वारीसह मका, गहू, आदी रब्बीचे पिके जमीनदोस्त झाली.

रब्बीच्या ज्वारीची काही भागात फुलोऱ्यावर  आली होती. परंतु अचानक तयार झालेल्या या वादळाने मात्र बहरलेल्या मक्याला जमीनदोस्त करून टाकले. तालुक्यात खरिपाच्या हंगामातही अवकाळी पावसाने देखील रब्बी पिकांचे मोठे नुकसान केले होते. त्यामुळे खरीपात पिकांचे उत्पन्न हातात न आल्याने कुटुंबाला खाण्यासाठी  व्हावी, यासाठी रब्बीचा  हेक्टरवर तालुक्यात  पेरा झाला होता.

अचानक आलेल्या वादळाने मात्र रब्बीच्या पिकांनाही जमीन दाखविल्याने  तालुक्यात दोन्ही हंगामात  उत्पन्न न आल्याने मात्र शेतकरी हवालदिल झाला आहे. या वादळी हवेने मका, गहू आणि फळबागांचे देखील मोठे नुकसान झाले असून, अनेक भागात  रब्बीच्या पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

तीन मंडळात धुमाकूळ  – शहरासह तालुक्यात मांडळ मारवड कळमसरे भागात  महसुली मंडळांत वादळी वाऱ्याचा जोर रात्रभर कायम राहिल्याने रब्बीच्या  पेरण्या झालेल्या पिकांपैकी तब्बल तीन मंडळातील गहू मका रब्बी ज्वारी दादर  पिकांना या वादळाचा फटका बसला आहे.  तालुक्यातच शनिवारी रात्री  अचानक वाऱ्यांच्या वेगाने हे नुकसान झाले  आहे. दरम्यान शासनाचा अधिकारी अद्याप बांधावर नाही. तालुक्यात विविध भागात  शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. मात्र दिवसभरात तालुका कृषी विभागाचा एकाही अधिकारी शेतीच्या बांधावर आला नव्हता.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Protected Content