आता प्रचार करणार्‍या व्हिडीओ व्हॅनसाठी देखील नियमावली

नवी दिल्ली वृत्तसंस्था | आगामी निवडणुकांसाठी नियमावली जाहीर करतांना आज केंद्रीय निवडणूक आयोगाने व्हिडीओ व्हॅन साठी देखील नियम जाहीर केले आहेत.

 

निवडणूक आयोगाने एक पत्र जारी करत व्हिडीओ व्हॅन संदर्भातील नियमावली जाहीर केली आहे. यात निवडणूक प्रचारांच्या रॅली आणि सार्वजनिक सभांवर  असलेली बंदी  देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता निवडणूक आयोगाने ३१ जानेवारीपर्यंत कायम ठेवली आहे. रॅली आणि सभांवर बंदी असली तरी निवडणुकीच्या प्रचारासाठी व्हिडीओ व्हॅनचा वापर करण्यास परवानगी दिली आहे. या नव्या  आदेशानुसार व्हिडीओ व्हॅनला एका जागेवर ३० मिनीटापेक्षा अधिक प्रचार करता येणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता निवडणूक आयोगाने ३१ जानेवारीपर्यंत रॅली आणि सभांवर बंदी घातली आहे. दरम्यान आयोगाने शनिवारी रिकाम्या जागेवर कोरोना नियमांचे पालन करत ५०० जणांच्या उपस्थितीत व्हिडीओ व्हॅनद्वारे प्रचार करण्यास परवानगी दिली आहे. परंतु ही व्हिडीओ व्हॅनला एका जागेवर ३०  मिनिटांपेक्षा अधिक वेळ थांबता येणार नाही.

आजच्या नियमावलीनुसार  राजकीय पक्ष त्यांचा प्रचार करण्यासाठी व्हिडीओ व्हॅनचा उपयोग करू शकतात. जे उमेदवार प्रचारासाठी व्हिडी व्हॅनचा वापर करणार आहे त्यांना तो खर्च निवडणूक आयोगाला दाखवावा लागणार आहे. निवडणूक अधिकार अशा खर्चांवर लक्ष ठेवणार आहे. आयोगाने म्हटले आहे की, ही व्हिडीओ व्हॅन सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंत परवानगी दिली आहे. रॅली आणि रोड शो दरम्यान या व्हॅनचा वापर करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही.

Protected Content