जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाने वृध्द भावाला डिझेल टाकून जिवंत जाळले

नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जमिनीच्या मालकीवरुन शेजारी राहणाऱ्या सख्ख्या भावाने वृद्ध भावावर डिझेल टाकून त्याला पेटवून ठार मारले आहे. या घटनेमुळे तालूक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. निफाड तालुक्यातील थडी सारोळे गावात ही घटना मंगळवारी दुपारी घडली. जो पर्यंत आरोपींना अटक होत नाही टो पर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका नगरे यांच्या कुटुंबीयांनी घेतली असून या मुळे तणाव निर्माण झाला आहे. कचेश्वर नागरे असे या घटनेत मृत्यू झालेल्या वृद्ध भावाचे नाव आहे. कचेश्वर हे घरी एकटे असतांना त्यांच्या सख्ख्या भावाच्या कुटुंबीयांनी त्यांच्या अंगावर डिझेल टाकले व त्यांना पेटवून दिले. यात कचेश्वर नागरे हे ९५ टक्के भाजल्याने त्यांचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असतांना मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी कचेश्वर नागरे यांचा मुलगा संजय नागरे याणणे पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थडी सरोळे गावात राहणारे नांदूर मध्यमेश्वर चांगदेव महादू नगरे आणि कचेश्वर महादू नागरे यांच्यात शेत जमिनीवरून वाद होता. कचेश्वर महादू नांगरे व त्याची पत्नी जिजाबाई नांगरे हे वयोवृद्ध आहेत. हे दोघेही घरी एकटेच राहत असायचे. कचेश्वर यांचा एक मुलगा त्यांच्या शेजारी राहत होता. मात्र, तो बाहेर गेला होता. या संधीचा फायदा आरोपींनी घेतला.

कचेश्वर हे मंगळवारी अंगणातील कचरा साफ करत असतांना शेजारी राहत असलेल्या त्यांच्या भावाच्या कुटुंबीयांनी डिझेलसदृश कचेश्वर यांच्या अंगावर फेकून आग लावून पळून गेले. आग लागल्यामुळे कचेश्वर नागरे हे जीव वाचण्यासाठी ओरडू लागले. त्यांचा आवाज ऐकून त्यांचे कुटुंबीय घराबाहेर धावत आले. मात्र, आरोपी चांगदेव नागरे व त्याचे कुटुंब घटनास्थळावरून पळून गेले होते. कचेश्वर यांना तातडीने दवाखान्यात भरती करण्यात आले. मात्र, ते ९५ टक्के भाजले असल्याने उपचार सुरू असतांना त्यांच्या मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपींचा शोध घेतला जात आहे.

Protected Content