वाहन चालकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे – पो.नि. धनवडे

YAVAL SAPTAH

यावल, प्रतिनिधी | “वाहन चालकाने वाहन चालावतांना आपल्याकडील वाहनाची वेगमर्यादा त्याचबरोबर वाहतुक नियमांचे काटेकोर पालन करावे. वाहनातील सहप्रवाशी त्याच मार्गाने चालणाऱ्या पादचाऱ्यांची सुरक्षा अबाधीत राहील याचा विचार करावा”, असे मनोगत येथील पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी आज (दि.१२) येथे व्यक्त केले. येथील एस.टी. आगाराच्या माध्यमातुन आज सकाळी सुरक्षा सप्ताह मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते.

 

एसटी बस आगारात आजपासुन सुरक्षित सप्ताह मोहीमेचे उदघाटन प्रभारी आगारप्रमुख एस.व्ही. भालेराव यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “आपण वाहन सेवेत कार्यरत असतांना कायम सुरक्षित सेवा प्रदान करण्यासाठी कार्यतत्पर राहीले पाहीजे.”

या प्रसंगी पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार यांच्या हस्ते सर्व कर्मचारी बांधवांना सुरक्षीत सप्ताहाचे बिल्ले वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाला आगाराचे अनिल बाविस्कर, डी.बी. महाजन, खतीब तडवी, एस.व्ही. मोरे, सी.आर. पाटील, एम.आय. तडवी, डी.आर. भालेराव, रमाकांत पाटील, ललित चौधरी व सुरेश चौधरी यांच्यासह मोठया संख्येने आगारातील वाहक चालक, महिला कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महाराष्ट्र कामगार संघटनेचे सचिव प्रकाश पी.रावते यांनी केले तर आभार आगारातील लिपीक अतुल चौधरी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेन्द्र पाटील, कैलास पाटील यांच्यासह आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Protected Content