सावखेडा सिम येथील तरूणाची बीएसएफमध्ये निवड; ग्रामस्थांकडून सत्कार

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील सावखेडा सिम येथील आदीवासी तरूणाची देश रक्षणासाठी बीएसएफच्या सेवेत नियुक्ती करण्यात आली आहे. या निमित्ताने ग्रामस्थांकडून तरूणासह कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला.

सावखेडा सिम ग्रामपंचायत सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत आशीर्वाद फाऊंडेशनच्या वतीने बीएसएफमध्ये निवड झालेल्या असलम अमिन तडवी याची नुकतीच निवड करण्यात आली आहे. या निमित्ताने आज सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात भावी जवानाचा त्याच्या कुटुंबियांसोबत सत्कार करण्यात आला. असलम तडवी हा एकमेव तरूण देश सेवेत रूजू होत आहे.  आशीर्वाद फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष अजय पाटील सर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य यांच्या उपस्थित हा सत्कार सोहळा पार पडला. याप्रसंगी जवानाचे मोठे वडील शावखा तडवी, वडील अमिन तडवी यांचाही ही सत्कार करण्यात आला. या प्रसंगी अजय पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करून देशाच्या रक्षणासाठी जाणाऱ्या आपल्या मातीतला आदीवासी भुमीपुत्राबाबत आपणास अभीमान वाटत असल्याचे बोलुन  त्यांच्या कुटुंबाचे विशेष कौतुक केले.

 

यावेळी उस्मान तडवी, लक्ष्मण बडगुजर, मुस्तफा तडवी, बेबाबाई पाटील, सिकंदर तडवी, साधना तडवी ,नबाब तडवी, नसीमा तडवी, रजिया तडवी, मुबारक तडवी, अभिजीत साळवे, वर्षा पाटील, फातमा तडवी, अलिशान तडवी यांचेसह अनेक तरुण व सावखेडा सिम गावाचे ग्रामस्थ समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते

Protected Content