Home ट्रेंडींग लवकरच शिक्षकांनाही लागू होणार ‘ड्रेस कोड’ !

लवकरच शिक्षकांनाही लागू होणार ‘ड्रेस कोड’ !


मालेगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लवकर विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षकांना देखील ‘ड्रेस कोड’ लागू होणार असून आज शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मालेगावातील कार्यक्रमात याबाबतचे सूतोवाच केले.

राज्य सरकारच्या शालेय शिक्षण खात्याने संपूर्ण राज्यभरात विद्यार्थ्यांना एकाच रंगाचा गणवेश असेल असा निर्णय घेतला होता. यानंतर हा निर्णय बदलण्यात आला होता. यातच आता शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी एका कार्यक्रमात बोलतांना शिक्षकांना ‘ड्रेस कोड’ लागू करण्यात येईल याचे सूतोवाच केले आहे.तथापि, हा ड्रेस कोड नेमका केव्हा लागू होईल ? याबाबतची माहिती त्यांनी दिलेली नाही.

शिक्षकांना एकसमान गणवेश असावा याबाबत कधीपासून चर्चा सुरू असली तरी यावर निर्णय झालेला नव्हता. याआधी गेल्या वर्षी यानंतर आता शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी याबाबत पुन्हा एकदा सूतोवाच केले असून याबाबतचा शासकीय आदेश नेमका केव्हा जारी करण्यात येणार ? याची उत्सुकता लागली आहे.


Protected Content

Play sound