जळगाव प्रतिनिधी | “एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात असलेल्या वाहनांवरील ‘महाराष्ट्र शासन ‘हे नाव काढावे” या मागणीसाठी संपकरी एसटी कर्मचारी यांनी जळगाव उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन दिले.
एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात असलेल्या वाहनांवरील ‘महाराष्ट्र शासन ‘हे नाव काढण्याबाबत जळगाव उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संपकरी यांना आज सोमवार, दि.१० जानेवारी रोजी एसटी कर्मचारी यांनी निवेदन देण्यात दिले.
या निवेदनात, “MH-14-HK-4304, MH-14-HK-4305, MH-06-S-9165 आणि तत्सम इतर वाहने ही विभाग नियंत्रक, विभागीय कार्यालय, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, जळगाव तथा विभागीय कार्यशाळा, जळगाव यांच्या अधिपत्याखाली आहे, या वाहनांवर ‘महाराष्ट्र शासन’ असे लिहिलेले आहे, महाराष्ट्र शासनाचे एकही अधिकारी विभागीय कार्यालय तथा कार्यशाळा येथे कार्यरत असून जे अधिकारी आहेत ते महामंडळाचे अधिकारी आहेत, तरी जळगाव विभागीय कार्यालयातील अधिकारी हे ‘महाराष्ट्र शासन’ नाव या वाहनावर लिहून सर्रासपणे दुरुपयोग करत आहेत.”असे निवेदनात म्हटले आहे.
पुढे निवेदनात, “सदर वाहनावर ‘महाराष्ट्र शासन’ नाव असल्याने रस्त्यावरील टोल नाके सदर वाहनाला लागत नसून त्यामुळे एकप्रकारे महामंडळाचे अधिकारी सरकारची आणि सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करत आहेत अशी शंका आम्हा कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे.
वरील सर्व वाहनावर लिहिलेले ‘महाराष्ट्र शासन’ हे नाव महामंडळाच्या संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांशी शहानिशा करून जर चूकीच्या हेतूने वाहनावर लिहण्यात आले असेल तर ते ताबडतोब काढण्यासाठीच्या सूचना आपण महामंडळाच्या अधिकाऱ्यांना देण्यात याव्यात आणि संबंधित अधिकाऱ्यांना अधिकार नसताना जर ‘महाराष्ट्र शासन’ या नावाचा गैरवापर केला व ज्या अधिकाऱ्यांच्या नियंत्रणात हा गैरवापर चालला त्यांच्यावर R.T.O. नियमानुसार दंडात्मक कारवाई करुन, आतापर्यंत झालेल्या सरकारचे नुकसान महामंडळाच्या आमच्या व जनतेच्या पैश्यातून न करता, त्या अधिकाऱ्यांच्या पगारातून रक्कम वसूल करण्यात यावी, तसेच ‘शिवशाही बस’ या भाडे तत्वावर चालणाऱ्या खाजगी बस आहेत, त्यावर देखील जो ‘रा.प.म.’ चा लोगो आहे तो अनधिकृत आहे, तो ही काढण्यात यावा” अशी मागणी संपकरी एसटी कर्मचारी यांनी केली आहे.