डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात जैविक कचरा व्यवस्थापन व हातांची स्वच्छतावर कार्यशाळा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात आज सफाई कामगारांसाठी  जैविक कचरा व्यवस्थापन व हातांची स्वच्छतावर कार्यशाळेचे उदघाटन वैद्यकिय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन एस आर्विकर, अधिष्टाता डॉ. प्रशांत सोळंके, वैद्यकिय अधिक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत, मायक्रोबॉयोलॉजी विभाग प्रमुख डॉ. कैलास वाघ आणि सफाई कामगार संघटनेचे प्रतिनीधी मनोजजी यांचे हस्ते दिपप्रज्वलन आणि शारदापूजनाने झाले.

मान्यवरांचा सत्कार डॉ कैलास वाघ,डॉ प्रशांत गुडडेटी यांचे हस्ते पुष्पगुच्छ देवून करण्यात आला. प्रमुख अतिथी डॉ. एन एस आर्विकर यांनी वैद्यकिय क्षैत्रात रूग्णालयाचे महत्व विषद केले तर डॉ. प्रेमचंद पंडीत यांनी सफाई कामगार हा वैद्यकिय क्षैत्रात महत्वाचा दुवा असल्याचे सांगितले, अधिष्टाता डॉ. प्रशांत सोळंखे यांनी वैद्यकिय क्षैत्रात स्वच्छतेशिवाय पर्याय नाही आपण मंदिरात देव असतात म्हणून स्वच्छता ठेवतो तशी रूग्ण आपल्यासाठी देवच आहे जंतूसंसर्ग रोखण्यासाठी स्वच्छतेशिवाय पर्याय नाही असे सांगितले.

यावेळी चित्रफितीच्या माध्यमातून जैविक कचरा व्यवस्थापन करतांना हाताची सुरक्षा कशी राखावी यावर चित्रफितीच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले. यशस्वीतेसाठी विभाग प्रमुख डॉ. कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनानुसार मायक्राबॉयोलॉजी विभागाच्या प्राध्यापक, डॉ. प्रशांत गुडीती,डॉ. भवानी शंकर वर्मा,डॉ. अब्दुला एम डी. व स्वच्छता विभागाचे मॅनेजर मनोज राठोड व कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.

Protected Content