आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करा : आ. शिरीषदादा चौधरी यांचे आवाहन

रावेर, प्रतिनिधी । आरोग्य यंत्रणा तसेच प्रशासनाने तालुक्यात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी चांगले काम केले . परंतु, सामाजिक शिस्त पाळली गेली नाही म्हणून संसर्ग वाढला असून प्रशासनाला सोबत घेऊन कोरोना विरुध्द एकत्र लढाई लढायची आहे. कार्यकर्तेनी व जनतेने सामाजिक जबाबदारी पार पाडली तर निश्चित कोरोनाला आवार घालता येईल. नागरीकांनी आरोग्य विभागाच्या सूचनेचे पालन करावे असे आवाहन आमदार शिरीषदादा चौधरी यांनी सर्वपक्षीय बैठकीत केले.

सर्व पक्षीय बैठकीला प्रांतधिकारी डॉ अजित थोरबोले, डिवायएसपी नरेंद्र पिंगळे, तहसिलदार उषाराणी देवगुणे, गट विकास अधिकारी डॉ सानिया नाकडे, नगराध्यक्ष दारा मोहोम्मद, पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे भाजपा जिल्हाउपाध्यक्ष पद्माकर महाजन,शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रल्हाद महाजन,पालिका सिईओ रविंद्र लांडे, डॉ एन डी महाजन,जि प सदस्य नंदकिशोर महाजन, कैलास सरोदे, प.स.सदस्य योगेश पाटील, दीपक पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, कॉग्रेस तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, माजी जिप सदस्य रमेश पाटील, रविंद्र पवार, डॉ. राजेंद्र पाटील, राष्ट्रवादी शहराध्यक्ष महेमूद शेख, दिलीप कांबळे, राजू सर्वेने, अशोक शिंदे, बाळु शिरतुरे,अॅड योगेश गजरे आदी उपस्थित होते.

बैठकीला सरपंच,लोकप्रतिनिधींच्या दांड्या

तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आमदार शिरीषदादा चौधरी यांनी कोरोना संदर्भात बोलविलेल्या महत्वाच्या बैठकीला तालुक्यात अनेक सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्यांनी बैठकीला दांडी मारल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

पुढील सहा महीने महत्वाचे; प्रांतधिकारी

कोरोनाच्या संक्रमणापासून बचावाकरिता पुढील सहा महिने काळजी घेणे खुप गरजेचे आहे.कोरोना रुग्णांची संख्या तालुक्यात वाढत असुन यामुळे रोगप्रतिकाराक शक्ती कमी असलेल्यांनी लवकरात लवकर उपचार करा . वयोवृध्द व आजारी रुग्णांची देखील काळजी घ्या . रोग प्रतिकार शक्ती कमी असलेल्या रूग्णांचा मृत्यू टाळण्यासाठी रुग्णाला डॉक्टरांपर्यंत पोहचवा . त्यांची तपासणी करा , गरजेनुसार स्वब व ऑक्सीजनची लेव्हल तपासून घ्या , ताप , सर्दी , खोकल्याकडे दुर्लक्ष करू नका , तपासणीला घाबरू नका असे सर्वपक्षीय बैठकीत डॉ. अजित थोरबोले यांनी सांगितले.

सर्वपक्षीय बैठकीत कोण-काय बोलले

नंदकिशोर महाजन (जि प सदस्य) बैठकीत म्हणाले की,  आताच तालुक्यातील जनता लॉकडाऊन मधून आताच बाहेर आली आहे अनेक गरीब कुटुंब रोजगाराच्या शोधात बाहेर पडत असतांना जनता कर्फ्यू लावु नये प्रत्येकाने स्वतःच काळजी घ्यावी

पद्माकर महाजन(भाजपा उपाध्यक्ष) बैठकीत म्हणाले की रावेर शहरात हात गाड्यासाठी नगर पालिका प्रशासनाने इतर ठिकाणी त्यांची व्यवस्था करण्याची मागणी त्यांनी केली

राजन लासुरकर(भाजपा तालुकाध्यक्ष) बैठकीत म्हणाले कोरोना बाबत तालुक्यात भितीचे वातावरन असून प्रशासन व पदाधिकारी यांच्यात समन्वयचा ठेवला गेला पाहीजे.

प्रल्हाद महाजन (शिवसेना उप जिल्हाप्रमुख) म्हणाले कोविड सेंटर वरुन येणाऱ्या तक्रारी कडे दुर्लक्ष करू नका त्यांना सुविधांचा अभाव दिसतोय म्हणून प्रशासना कडे तक्रारी येताय

रविंद्र पवार यांनी रावेर शहरात जनता कर्फ्यू लावण्याची मागणी केली त्यांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीत उपाय सूचवला.

यांचा झाला सत्कार
सर्वपक्षीय बैठकीत कोरोना विरुध्द लढणारे प्रांतधिकारी डॉ अजित थोरबोले,डिवायएसपी नरेंद्र पिंगळे,तहसीलदार उषाराणी देवगुणे,पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे, डॉ. एन. डी. महाजन, डॉ. शिवराज पाटील, सिईओ रविंद्र लांडे यांचा आमदार शिरीषदादा चौधरी यांनी सत्कार केला.

Protected Content