डॉ. उल्हास पाटील सीबीएसई स्कुलमध्ये सायबर क्राईमवर मार्गदर्शन

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम सीबीएससी स्कूल सावदा येथे सायबरवर मार्गदर्शन करण्यात आले. एमकेसीएल कडून आलेले उमाकांत बडगुजर यांनी विद्यार्थ्यांना आजच्या धकाधकीच्या जीवनात मोबाईलचा वापर करताना अतिशय काळजीपूर्वक मोबाईल हाताळला पाहिजे.

आपल्याला जर निनावी फोन आला असेल निनावी व्हाट्सअप कॉल आला असेल किंवा आपल्याला ओटीपी वगैरे आला असेल तर त्या निनावी प्रकाराला आपण प्रतिसाद द्यायचा नाही. फसवणूक जर झालीच तर सायबर ऑफीसला अथवा वेबसाईवर जाउन तक्रार करावी असे सांगितले.

यातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये भर पडली तसेच सायबर क्राईम विषयाचे ज्ञान वाढले यावेळी प्रिन्सिपल भारती महाजन यांचेसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विदयार्थी उपस्थीत होते.

 

Protected Content