ॲड.ललिता पाटिल इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन “कलादर्पण” उत्साहात संपन्न…

अमळनेर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |  “छत्रपती शिवाजी महाराज यांचे महानाट्य सादर करत विद्यार्थ्यांनी उपस्थितीत सर्वांची जिंकली मने”

शिवकन्या पुरस्काराने सन्मानित शाळेच्या संस्था अध्यक्षा ॲड. ललिता पाटील, संस्थेचे सचिव प्रा. श्याम पाटील, संस्थेचे संचालक: श्री. अशोक पाटील, सौ. कमल पाटील, श्री . दिनेश पाटील, श्री. पराग पाटील, प्राचार्य श्री.नीरज चव्हाण, सर्व निमंत्रित प्राचार्य, प्रा. प्रकाश महाजन, उपप्राचर्या अश्विनी चौधरी, वरीष्ठ पर्यवेक्षिका जयश्री भोसले यांनी दीप प्रज्वलन करून स्नेहसंमेलनाचे उ‌द्घाटन केले.
यानंतर प्राचार्य श्री. नीरज चव्हाण यांनी मागील दहा वर्षांचा व वार्षिक आढावा सादर करत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणारे जिल्ह्यातील गुणवता प्रदान करणारे अग्रगण्य नामांकित स्कूल असल्याचा अभिमान व्यक्त केला आणि पालकांनी दाखवलेल्या विश्वासहर्तेसाठी त्यांचे आभार मानले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा ॲड. ललिता पाटील मॅडम यांनी शाळा निर्मितीचे खडतर अनुभव कथन केले आणि सर्वांना आनंदी जीवन जगण्याचा मूलमंत्र देखील दिला.

यावेळी दहावी व बारावी सीबीएसई परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या प्रथम पाच आलेल्या विद्यार्थ्यांचा पालकांसह सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांनी तालुक्यात पहिला येत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी गणेश वंदना आणि शिव तांडव नृत्य सादर करत केली.
यानंतर विद्यार्थ्यांच्या रंगारंग नृत्याने सर्व प्रेक्षकांना खिळवून ठेवले. राजा शिव छञपती आणि स्वामी विवेकानंद यांच्यावरील सजीव नाट्यप्रयोग हे या स्नेसंमेलनाचे सर्वांत मोठे आकर्षण होते… अतिशय सुबकरित्या अभिनय सादर करत विद्यार्थ्यांनी सर्वांची वाहवा मिळवली.
यानंतर आदिवासी नृत्य, राजस्थानी घुमर, गुजराती गरभा, काश्मिरी रऊफ नृत्य, मराठी लावणी, जोगवा, मातृ पितृ देवो भव चा संदेश नृत्य पासून ते दक्षिण भारत पर्यंत सर्व भारतीय संस्कृतीला साजेसे व अनुसरून असलेले नृत्याविष्कार नर्सरी पासून ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. तसेच जिजामाता जयंती निमित्त महिला शिक्षिकांनी जिजाऊ जीवनपट सादर करत आगळी वेगळी मानवंदना दिली. यावेळी एकापेक्षा एक अशा सरस नृत्य व नाटिकांची मेजवानीचा आनंद उपस्थित सर्व प्रेक्षक व पालकांनी मनमुराद घेत विद्यार्थ्यांना उत्स्फूर्त दाद दिली.

शाळेला दहा वर्षांहून अधिक कार्यकाळ झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा देखील सत्कार यावेळी करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रंचालन शिक्षक विलास पाटिल व मुस्कान ढिंगराई या सोबतच विद्यार्थ्यांपैकी गायत्री, लुईजा, मृणाल, संजीवनी, हर्षदा, प्रियांशी यांनी देखिल आपल्या सुत्रसंचलनाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. शेवटी आभार शिक्षक केदार देशमुख व निलेश वानखेडे यांनी केले.

कार्यक्रमाच्या डिजिटल ब्रॉड कास्टिंग संगणक विभागाचे शिक्षक अतुल भदाने, अनुश्री जोशी, ऋतुजा जोशी यांनी मेहनत घेतली, तर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.

Protected Content